पारंपारिक धर्मात, वट सावित्री व्रत विवाहित महिलांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. या व्रताच्या प्रभावाने कुटुंबात सुख-समृद्धी येते. हे व्रत २१ जून रोजी साजरे होणार आहे. असे म्हटले जाते की हे व्रत पाळल्याने घरात सुख-समृद्धी येते. तसेच पतीला दीर्घायुष्य लाभते.
या दिवसाबद्दल ज्योतिषशास्त्राने अनेक नियम सांगितले आहेत. या नियमांचे पालन केल्यास पूजा पूर्णतः फलदायी होते. या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो.
वट सावित्रीचे व्रत जेष्ठ/वैशाख महिन्यातील अमावस्या आणि ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते. अमावस्या तिथीला वट सावित्री व्रत ६ तारखेला आहे, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये अमावस्या तिथीला वट सावित्री व्रत पाळले जाते. तर पौर्णिमेला वट सावित्री व्रत २१ जूनला पाळले जाईल, गुजरात आणि महाराष्ट्रात पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत करण्याची परंपरा आहे.
वटवृक्षाला या गोष्टी अर्पण करा :
वटसावित्री व्रताच्या दिवशी गायीचे दूध पाण्यात मिसळून वटवृक्षाला अर्पण करावे. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. वटवृक्षात भगवान विष्णू, भगवान शिव आणि ब्रह्मदेव राहतात असे म्हणतात. अशा वेळी वटवृक्षाची पूजा योग्य पद्धतीने केल्यास जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.
वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी. वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या. हे झाड देवाचे प्रतीक मानले जाते. वटवृक्ष सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो. अशा वेळी व्रत नसतानाही वटवृक्षाची पूजा करावी.