व्यवसाय वाढवण्यासाठी सोपे वास्तू उपाय -
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती हवी असते, पण कधी-कधी मेहनत करूनही त्याला व्यवसायात यश मिळत नाही. प्रत्येक व्यावसायिकाला व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागतो परंतु सतत तोटा होणे किंवा आर्थिक वाढ न होणे हे चांगले लक्षण नाही. अनेक वेळा व्यवसायात नुकसान झाल्याने कर्ज घ्यावे लागते. वास्तुशास्त्रामध्ये व्यवसायात वाढ आणि प्रगतीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूतज्ञ मुकुल रस्तोगी यांच्याकडून व्यवसाय वाढवण्याचे मार्ग जाणून घ्या-
व्यवसायात प्रगतीसाठी वास्तू उपाय -
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या व्यवसायात सुधारणा करण्यासाठी तुमच्या दुकानाच्या उत्तर-पश्चिम दिशेला अर्धचंद्राचे चित्र लावा.
व्यवसायात यश मिळवण्यासाठी वास्तू उपाय -
वास्तुशास्त्रानुसार शोरूमच्या दक्षिण-पूर्व दिशेला संगमरवरी गाय आणि वासरू ठेवावे. असे केल्याने व्यवसायात प्रगती होते असे म्हणतात.
चांगला व्यवसाय चालवण्यासाठी वास्तू टिप्स -
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही गुरुवारी गल्ल्यात पिवळ्या कपड्यात सात खारका (सुके खजूर) बांधून ठेवाव्यात. असे केल्याने व्यवसायात समृद्धी येते असे म्हणतात. माता लक्ष्मीचे आगमन होते.
वास्तूनुसार व्यवसाय वाढवण्यासाठी काय करावे -
वास्तूतज्ज्ञांच्या मते, व्यवसायात विस्तारासाठी किंवा प्रगतीसाठी दक्षिण-पूर्व दिशेला हलक्या गुलाबी रंगाचा बल्ब लावावा.