पावसाळा सुरू झालाय तेव्हा मातीच्या सुगंधासह फुलांचा गंध देखील दरवळतो. आता दुर्गापूजाही येईल तेव्हा देवी लक्ष्मीला जी फुले आवडतात ती आपल्या दारी असायलाच हवी. तेव्हा तर लक्ष्मी आपल्या घरी-दारी येईल. पारिजातचा सुगंध प्रत्येकाला आवडतो आणि देवी लक्ष्मीचेही हे आवडते फुल आहे. वास्तुशास्त्रानुसार पारिजातकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दुर्गापूजेमध्ये ही फुले असतात, पारिजातक घरात असणं चांगलं आहे का? घराच्या कुठल्या बाजूला पारिजातकाचे झाड असेल तर ते शुभ असेल, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगते.
वास्तुशास्त्रानुसार हे पारिजात फुलांचे झाड घरात असेल तर घरातील विविध नकारात्मक बाबींच्या समस्या दूर होतात. या फुलाच्या वासामुळे मनःशांती मिळते, असेही मानले जाते. कुटुंबातील सदस्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पारिजातकाचे झाड अत्यंत महत्त्वाचे आहे.
असे म्हटले जाते की, घरात पारिजातचे झाड असेल तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते. तसेच आर्थिक भरभराटही होते. घराच्या बागेत तुळशीचे रोप असेल तर तेथेही हे रोप लावणे शुभ असते. पण जिथे पारिजातकाच्या फुलांचे झाड लावणे शुभ आहे ती दिशा कोणती ते जाणून घेऊया.
(Wikimedia commons)घराच्या ईशान्येला पारिजातकाचे झाड लावणे शुभ असते, त्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी येते. नकारात्मक विचार घरातून दूर होतात. अंगणात पारिजात लावल्याने आर्थिक चणचण दूर होते व संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. हे झाड घराच्या पूर्वेलाही लावता येते. हे झाड घराच्या पश्चिम किंवा वायव्य दिशेला लावणे शुभ असते.