Navratri Vastu Tips : नवरात्रीत पाळा वास्तूशी संबंधित 'हे' नियम, मिळेल देवीचा आशीर्वाद-vastu tips to be remembered during navratri ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Navratri Vastu Tips : नवरात्रीत पाळा वास्तूशी संबंधित 'हे' नियम, मिळेल देवीचा आशीर्वाद

Navratri Vastu Tips : नवरात्रीत पाळा वास्तूशी संबंधित 'हे' नियम, मिळेल देवीचा आशीर्वाद

Oct 14, 2023 09:58 AM IST
  • twitter
  • twitter
Navratri Vastu Tips : उद्यापासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होतेय. नवरात्रीच्या ९ दिवसांत देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते. हे करताना वास्तूशी संबंधित काही नियमांची काळजी घ्यायला हवी.
नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी पूजा विधी महत्त्वाचा असतोच, पण त्यासोबत वास्तूशी संबंधित नियमांचं पालनही केलं पाहिजे. वास्तूमधील एखादा दोषही देवीला नाराज करू शकतात. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष करता कामा नये. जाणून घेऊया वास्तूशी संबंधित महत्त्वाचे नियम...
share
(1 / 10)

नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पूर्व किंवा उत्तर दिशेला स्वस्तिक लावा. यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आनंदात भर पडते. तसंच, घरातील सर्व सदस्य निरोगी राहतात, असं मानलं जातं.
share
(2 / 10)

वास्तुशास्त्रानुसार, नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या मूर्तीती प्रतिष्ठापना ईशान्य दिशेला (घराच्या ईशान्येकडील कोपऱ्यात) करणं शुभ मानलं जातं. ते शक्य नसेल तर  उत्तर किंवा पश्चिम दिशेला मूर्ती ठेवता येईल. मात्र, देवीची मूर्ती दक्षिण दिशेला ठेवू नये.
share
(3 / 10)

नवरात्रीच्या काळात देवीच्या मूर्तीसोबत ईशान्येकडच्या कोपर्‍यात शुद्ध पाण्यानं भरलेलं भांडंही ठेवावं. पाण्यानं भरलेला कलश ठेवल्यानं आर्थिक स्थिती मजबूत होते आणि घरात समृद्धी येते, असं म्हणतात.
share
(4 / 10)

नवरात्रीमध्ये दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी तिला लाल फुले आणि श्रृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. पूजेच्या वेळी चुकूनही काळ्या रंगाचा वापर करू नये, असं करणं अशुभ मानलं जातं.
share
(5 / 10)

वास्तुशास्त्रानुसार, दुर्गा देवीची पूजा करताना मुख नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडं असावं. या दिशेला तोंड करून पूजा केल्यानं मान-सन्मान आणि संपत्ती वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
share
(6 / 10)

नवरात्रीत अखंड दीप प्रज्ज्वलि करत असाल तर त्यासाठी तूप किंवा तिळाच्या तेलाचा वापर करावा. तुपाचा दिवा देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला तर तिळाच्या तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा.
share
(7 / 10)

वास्तुशास्त्रानुसार, आग्नेय कोपर्‍यात अखंड दीप लावावा. या दिशेला दिवा लावल्यानं घरात सुख-समृद्धी वाढते आणि जीवनातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं.
share
(8 / 10)

नवरात्रीच्या ९ दिवसांत घरातील वातावरण स्वच्छ, शुद्ध आणि प्रसन्न ठेवावं. घराचा एकही कोपरा अस्वच्छ नसावा. घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक करण्यासाठी गंगाजल शिंपडू शकता.
share
(9 / 10)

डिस्क्लेमर : या लेखातील माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.
share
(10 / 10)

इतर गॅलरीज