Vastu Tips About Lizard : पूजाघरात पाल दिसली तर ते चांगले की वाईट याबाबत काही लोकांना शंका असते. तसेच, स्वप्नात पाल दिसणे कशाचे संकेत असतात? हे जाणून घेऊया.
(1 / 4)
काही लोक पालीला घाबरतात आणि किळसही वाटते. घरात पाल असणे कुणालाच आवडत नाही. पण वास्तुशास्त्र आपल्याला सांगते की, पूजेच्या खोलीत देवघरात पाल असणे चांगले आहे की वाईट आणि ते कशाचे प्रतीक असते.
(2 / 4)
वास्तुशास्त्रानुसार पूजाघरात पाल दिसणे हे शुभ लक्षण आहे. पाल व सरडे हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजाघरात पाल असल्यास वास्तुनुसार समृद्धी येते, असे मानले जाते. यामुळे आर्थिक समस्या आणि सुखापासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
(3 / 4)
वास्तुशास्त्रानुसार स्वप्नात पाल दिसणे अशुभ असते. वास्तू तज्ञांचे म्हणणे आहे की हे काहीतरी वाईट घडणार असल्याचे लक्षण आहे.
(4 / 4)
वास्तू तज्ञांचे म्हणणे आहे की, घराच्या भिंतीवर भांडणारे पाल सुद्धा चांगले नाही. हे घरातील समस्या दर्शवते असे मानले जाते. हे वाईट लक्षण मानले जाते.
(5 / 4)
जर तुम्ही स्वप्नात पाल घरात शिरताना पाहात असाल तर याचा अर्थ हे स्वप्न पाहाणं अत्यंत अशुभ आहे असा होतो. तुमच्या आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकते. परंतू, वास्तुशास्त्रानुसार घरासमोर पाल दिसणे वाईट नाही. काहींच्या मते हे पैशाचा ओघ देखील दर्शवते. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.