कौटुंबिक सुख-समृद्धीसाठी वास्तूशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. अनेक घरात असलेलं मनी प्लांट हे देखील त्याचाच भाग असतो. मात्र, वास्तूशास्त्रात सांगितल्यानुसार त्याचे लाभ मिळण्यासाठी काही नियमही पाळावे लागतात. तसं केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समिद्धी येणं निश्चित आहे.
(pexel)मनी प्लांट कोणालाही देऊ नये…
मनी प्लांट कधीही आपल्या नातेवाईक किंवा मित्रांना भेट म्हणून देऊ नये. असं म्हणतात की या कृतीमुळं तुमच्याकडं येणारी आर्थिक समृद्धी तुम्ही अव्हेरून ती दुसऱ्याकडं पाठवता. असं केल्यामुळं समृद्धीचा प्रवाह थांबतो.
(pixabay)मनी प्लांट नेहमी वरच्या दिशेनं जाईल हे पाहावं. या झाडाची पानं खालच्या दिशेनं झुकलेली असू नयेत. मनी प्लांटची पानं जमिनीवर पडू देणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखं आहे.
(pexel)मनी प्लांट कधीही घराबाहेर ठेवू नये. वास्तूनुसार ते घराच्या आत ठेवावं. या झाडाला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसते, त्यामुळं ते घरातच ठेवा, यामुळं घरात आर्थिक सुबत्ता येईल.
(pixabay)सुकून गेलेलं मनी प्लांट घरात ठेवू नये. याचा घराच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळं मनी प्लांटला रोज पाणी घाला आणि त्याची वाळलेली पानं तोडून फेकून द्या. मनी प्लांट दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावं. ही दिशा गणेशाची असल्याचं सांगितलं जातं.