Vastu Tips: घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी नक्की करा हे उपाय!
- Vastu Tips: घरावर वाईट नजर लागल्यामुळे अनेकदा कुटुंबातील सदस्यांचे जीवन संकटांनी घेरले जाते. त्याचबरोबर घरातील सदस्यांना सर्वत्र अपयशाला सामोरे जावे लागते. पण वास्तुच्या काही उपायांनी वाईट नजर दूर केली जाऊ शकते.
- Vastu Tips: घरावर वाईट नजर लागल्यामुळे अनेकदा कुटुंबातील सदस्यांचे जीवन संकटांनी घेरले जाते. त्याचबरोबर घरातील सदस्यांना सर्वत्र अपयशाला सामोरे जावे लागते. पण वास्तुच्या काही उपायांनी वाईट नजर दूर केली जाऊ शकते.
(1 / 8)
कधी कधी घराची वास्तू ठीक असतानाही घरातील संकटाची परिस्थिती कायम राहते, घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले नसते. व्यक्तीला प्रत्येक कामात अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि घरातील वातावरण नेहमी नकारात्मक राहते. याचे कारण वाईट नजर देखील असू शकते. नजर दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया.
(2 / 8)
लिंबू-मिरची: वाईट नजर टाळण्यासाठी शनिवारी घराच्या मुख्य दारावर लिंबू आणि मिरची लावा. दर शनिवारी नवीन लिंबू-मिरची दारावर लटकवून जुनी फेकून द्या.
(3 / 8)
मीठ-पाणी: वास्तूनुसार घराच्या जमिनीवर किंवा फरशीवर पाण्यात मीठ मिसळून पोछा लावला तर घरातील नकारात्मकता दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांना वाईट नजरेपासून दूर ठेवते.
(4 / 8)
कापूर जाळणे: घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी रोज सकाळी कापूर, लोबान, आणि गायीच्या शेणापासून बनवलेल्या गवरी जाळावे. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील वातावरण शुद्ध राहील.
(5 / 8)
कचरा साचू देऊ नकाः घराच्या छतावर जास्त कचरा साचू देऊ नका आणि छताच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. असे मानले जाते की घराच्या छतावर अधिक घाण आणि कचरा पसरल्याने घरामध्ये नकारात्मकता कायम राहते.
(6 / 8)
तुटलेला आरसा: वास्तूनुसार तुटलेला आरसा किंवा काच वापरल्याने वाईट नजर लागते. म्हणूनच घराच्या कोणत्याही भागात तुटलेल्या काचा ठेवू नका. शक्य तितक्या लवकर घराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करा.
(7 / 8)
भक्तीगीते ऐका: घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यासाठी भक्तीगीते ऐका. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओमचा जप करा. यामुळे घरातील सकारात्मक उर्जा वाढेल.
इतर गॅलरीज