Vastu Tips: तुळशीचं रोप भेट द्यावं की नाही?, याबाबत काय सांगतं वास्तशास्त्र?
Vastu Tips: हिंदू धर्मात तुळस अत्यंत प्रिय मानली गेली आहे. घरोघरी रोज तुळशीची पूजा केली जाते. तुळशीचं रोप भेट द्यावं की नाही याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं ते पाहूया.
(1 / 7)
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. तुळस ही भगवान श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीत माता लक्ष्मीचाही वास असतो असं मानलं जातं. तुळशीचं रोप एखाद्याला भेट द्यावं की नाही याबाबात वास्तुशास्त्रात काय सांगण्यात आलं आहे ते पाहूया.
(2 / 7)
आपल्या घरात असलेली तुळस इतरांना भेट देऊ नये असं वास्तुशास्त्र सांगतं. तुळशीचं आपल्या घरातलं रोप इतरांना भेट दिल्यास आपल्या घरातले चांगले विचार आपण त्या तुळशीसोबत देत आहोत असाही त्याचा अर्थ होतो असं वास्तुशास्त्र सांगतं.
(3 / 7)
तुळस भेट करावी की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं रोप दान करण्याबाबत काही नियम घालून दिले गेले आहेत. ते नियम काय आहेत ते पाहूया.(Freepik)
(4 / 7)
तुळशी भेट देण्याचे नियम: तुम्ही एखाद्याला तुळस भेट स्वरूपात देत असाल तर तुळस एका मातीच्या कुंडीत ठेवावी. तिला स्वच्छ करावे आणि मग हे तुळशीचं रोप त्या व्यक्तीला भेट स्वरूपात द्यावे.
(5 / 7)
तुळस भेट देण्याचे नियम:- वास्तुशास्त्रानुसार वाळलेली तुळस कुणालाही दान करू नये आणि रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाचं दान करू नये असंही वास्तुशास्त्र सांगतं.
(6 / 7)
तुळशीचे दान केल्याने काय फायदे होतात:- तुळस मुळातच पवित्र मानली गेली आहे. त्यामुळे तुळशीचं रोप दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
इतर गॅलरीज