Vastu Upay In Marathi : अरेन्ज मॅरेज असो किंवा लव मॅरेज नात्यात मतभेद होतातच, अशावेळी नवविवाहीत जोडप्यांनी या वास्तू टिप्सचा उपयोग करावा. वास्तूनुसार तुमची खोली अशी सजवा.
(1 / 8)
प्रत्येक जोडप्याला लग्नानंतर आपलं नातं घट्ट करायचं असतं. आपलं नातं इतरांपेक्षा वेगळं आणि विश्वासाचं असावं असं वाटत असेल तर अशा नवविवाहीत जोडप्यांनी या वास्तु उपायांचा उपयोग करावा.
(2 / 8)
वास्तुशास्त्रानुसार नवविवाहित जोडप्याची खोली दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला असावी. जर बेड रूम दक्षिण-पश्चिम दिशेला असेल तर ते पुरुष शक्ती संतुलित करते आणि स्त्रिकडे झुकते.
(3 / 8)
वास्तूनुसार नवविवाहित जोडप्याच्या खोलीत जास्तीचा दिवा ठेवणे महत्त्वाचे मानले जाते. बेड रूममध्ये एकच खिडकी असावी. कारण त्यामुळे जोडप्यांमधील तणाव कमी होतो.
(4 / 8)
नवविवाहित जोडप्यांना झोपण्याच्या दिशेकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. झोपताना आपले डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असले पाहिजेत. या दिशेला झोपल्यास आनंददायी झोप लागते. त्याशिवाय अंथरुणात गोडवा अनुभवता येतो.
(5 / 8)
वास्तु टिप्सनुसार बेडरुममध्ये आरसा लावणे शुभ आणि योग्य मानले जाते. यामुळे पती-पत्नीमधील दुरावा कमी होईल आणि त्यांच्यातील प्रेम वाढेल.
(6 / 8)
मुख्य बेडरुममध्ये रंगीबेरंगी लव्ह बर्ड्सचे चित्र लावा, त्यामुळे एकमेकांप्रती प्रेम वाढेल. नकारात्मक चित्र लावू नका. बेडरुममध्ये रंगीत प्रकाश व्यवस्था केल्याने तुमची जोडीदाराशी जवळीक वाढण्यास मदत होईल.
(7 / 8)
विवाहित जोडप्यांसाठी गुलाबी किंवा लाल रंग शुभ मानला जातो. हा रंग ब्लँकेट, पडदे इत्यादीसाठी वापरता येऊ शकतो.
(8 / 8)
बेडरूममध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नयेत असे वास्तूशास्त्र सांगते. कारण यामुळे वास्तूनुसार सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावर होऊ शकतो.