(2 / 7)मुलांची खोली पूर्व, उत्तर-पूर्व दिशेला ठेवा. पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशा ही ध्यान आणि शांतीची दिशा मानली जाते आणि या दिशेने सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सर्वाधिक असतो. शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या दृष्टीने ही बाब अत्यंत शुभ मानली जाते. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घराच्या ईशान्य दिशेची उर्जा सक्रिय करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. तसेच, ताजी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळावा यासाठी खिडक्या उघड्या ठेवा.