आपल्या घरात सुख-समृद्धी, पैसा यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेकजण पूजा-पाठ, होम-हवन असे उपाय करतात. घरातील सुख शांती आणि समृद्धी यात वास्तूशास्त्राची खूप मोठी भूमिका असते. अशा स्थितीत आपल्या घरातील योग्य जागी भगवान बुद्धाची मुर्ती ठेवल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते.
घराच्या प्रवेशद्वारावर- घराच्या प्रवेशद्वारावर रक्षा मुद्रामध्ये बुद्धाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. रक्षा मुद्रामध्ये, बुद्धाचा एक हात आशीर्वादाचे प्रतीक आहे आणि दुसरा हात सभोवतालच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. भगवान बुद्धाची मूर्ती दारात जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीवर सुंदर स्टँडवर ठेवावी.
घराच्या बागेत - जर तुम्ही तुमच्या घरात बाग बनवली असेल तर तुम्ही तिथेदेखील बुद्धाची मूर्ती बसवू शकता. वास्तूनुसार ध्यानाच्या मुद्रेतील बुद्धाची मूर्ती बागेत स्वच्छ ठिकाणी स्थापित करावी. यामुळे बागेत फिरताना किंवा ध्यान करताना तुम्हाला अधिक आरामदायी वाटते आणि मानसिक शांती मिळते. ज्यांना कोणत्याही प्रकारचा तणाव आहे किंवा अस्वस्थ वाटत आहे त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
मुलांच्या खोलीत - भगवान बुद्धांच्या मूर्ती वेगवेगळ्या मुद्रांमध्ये आढळतात, या मुद्रांचे वेगवेगळे अर्थ आहेत. मुलांच्या खोलीत बुद्धाची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवावी. पडलेल्या विश्रांतीच्या स्थितीत किंवा लहान डोके असलेली बुद्धाची मूर्ती देखील ठेवली जाऊ शकते. यामुळे अभ्यास करताना लक्ष केंद्रित राहण्यास मदत होते, तसेच यामुळे यशाची शक्यता वाढते.
पूजेच्या ठिकाणी- घरातील मंदिरातही भगवान बुद्धाची मूर्ती ठेवू शकता. यामुळे तुम्हाला पूजेदरम्यान एकाग्र होण्यास मदत होते. वास्तूनुसार येथे मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवा आणि मूर्ती तुमच्या डोळ्यांच्या समान पातळीवर असावी हेही लक्षात ठेवा. यापेक्षा खाली ठेवणे शुभ मानले जात नाही. बुद्धाची मूर्तीमुळे सकारात्मकता वाढते आणि मानसिक शांतीचा अनुभव येतो.
लिव्हिंग रूम- वास्तूनुसार बुद्धाची मूर्ती घराच्या दिवाणखान्यात उजव्या बाजूला झुकलेली असावी. भगवान बुद्धाचे तोंड पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे मूर्ती ठेवा. आपण ती टेबलवरदेखील ठेवू शकता. यामुळे तुमच्या घरात शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. व्यक्तीला मानसिक शांतता वाटते आणि समृद्धी देखील राहते.