मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips : बाळकृष्णाची मुर्ती कोणत्या दिशेला असावी? ही चुक मुळीच करू नका, श्रीकृष्णाची कृपा राहील

Vastu Tips : बाळकृष्णाची मुर्ती कोणत्या दिशेला असावी? ही चुक मुळीच करू नका, श्रीकृष्णाची कृपा राहील

May 11, 2024 06:47 PM IST Priyanka Chetan Mali

Vastu Tips About Balkrishna Idol : घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असल्यास त्याच्या पूजेचे काही नियम आहेत. शास्त्रानुसार सुख-समृद्धी मिळवण्यासाठी कोणते नियम पाळले पाहिजेत? जाणून घ्या

शास्त्रानुसार बाळकृष्ण भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की, बाळकृष्णाची मूर्ती केवळ सजवून वेदीवर ठेवली जाऊ नये, तर त्याची काळजी कुटुंबातील लहान सदस्यांप्रमाणेच केली पाहिजे. या बाळकृष्णेच्या पूजेचे विविध नियम आहेत. बघूया, बाळकृष्णाची मूर्ती घरात कोणत्या दिशेला ठेवणे शुभ असते. पूजेचे विविध नियम जाणून घ्या.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये ठेवणे शुभ - असे म्हटले जाते की घराच्या ईशान्य दिशेला बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे शुभ असते. घरामध्ये बाळकृष्णाचे लोणी चोरत असल्याचे चित्र असेल तर ते ईशान्य दिशेला लावणे फार शुभ असते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये ठेवणे शुभ - असे म्हटले जाते की घराच्या ईशान्य दिशेला बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे शुभ असते. घरामध्ये बाळकृष्णाचे लोणी चोरत असल्याचे चित्र असेल तर ते ईशान्य दिशेला लावणे फार शुभ असते.(wikimedia commons)

बाळकृष्णाची काळजी घेतांना ही चूक करू नका - असे म्हणतात, शास्त्राचे पालन करा आणि बाळकृष्णाच्या सेवेत कसलीही कमी ठेऊ नका, बाळकृष्णाला एकटे सोडू नका. कुठे जायचं असेल तर बाळकृष्णाला सोबत घेऊन जाणं चांगलं. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

अन्न देण्याचे नियम - बाळकृष्णाच्या मुर्तीसोबत गाय असेल तर दिवसातून ४ वेळा अन्न अर्पण करावे असे म्हणतात. असेही मानले जाते की बाळकृष्णाला त्याच्या जेवणात नारळाचा भात आवडतो. तसेच, घरात गाय असेल तर कुटुंब समृद्ध होते, घर इच्छित सुखाने भरलेले असते. बाळकृष्णाला मिठाई, लाडू, खीर, हलवा अर्पण करा.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

अन्न देण्याचे नियम - बाळकृष्णाच्या मुर्तीसोबत गाय असेल तर दिवसातून ४ वेळा अन्न अर्पण करावे असे म्हणतात. असेही मानले जाते की बाळकृष्णाला त्याच्या जेवणात नारळाचा भात आवडतो. तसेच, घरात गाय असेल तर कुटुंब समृद्ध होते, घर इच्छित सुखाने भरलेले असते. बाळकृष्णाला मिठाई, लाडू, खीर, हलवा अर्पण करा.(Wikimedia commons)

आरती आणि स्नानाचे नियम - घरात बाळकृष्ण असेल तर दिवसातून २ वेळा आरती करावी असे सांगितले जाते. सकाळ संध्याकाळ ही आरती करावी असे म्हणतात. तसेच देवपूजा करताना दिवसातून एकदा तरी बाळकृष्णाची आंघोळ घातली पाहिजे. देवाची कृपा मिळविण्यासाठी स्नान करण्यास विसरू नका. संध्याकाळच्या वेळी तुम्ही बाळकृष्णाला झोपाळ्यावर ठेऊ शकता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

झोपेचे नियम - रोज संध्याकाळी आरती करून बाळकृष्णाला झोपवायचे असेही सांगितले जाते. त्याच्यासाठी स्वतंत्र झोपण्याची जागा किंवा पाळणा ठेवण्याचा सल्ला देतात. यामुळे श्रीकृष्णाची कृपा राहते आणि बाळकृष्ण-श्री कृष्णाच्या कृपेने संसारात सुख-समृद्धी नांदते.  टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज