Vastu Tips About Clock : वास्तुशास्त्रानुसार घरात घड्याळ कोणत्या दिशेला ठेवावे आणि घड्याळ कोणत्या दिशेला ठेवू नये याची माहिती मिळते.
(1 / 7)
आपल्या घरात घड्याळ योग्य ठिकाणी ठेवले नाही तर सर्वसाधारणपणे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्या वाढतील.चला जाणून घेऊया घरात घड्याळ ठेवण्याची योग्य दिशा कोणती?
(2 / 7)
वास्तुशास्त्र सांगते की, घर समृद्ध होण्यासाठी घड्याळाचा आकार आणि घड्याळ ठेवण्याची दिशा योग्य असावी.
(3 / 7)
पूर्व दिशेला ठेवलेले घड्याळ घरात आनंद आणते, त्याचप्रमाणे वास्तुनुसार घड्याळ उत्तर दिशेला असले तरी त्याचा लाभ घराला मिळतो.
(4 / 7)
वास्तू सांगते की घड्याळ कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये, दुसरा पर्याय नसेल तरच गोल आकाराचे घड्याळ पश्चिम दिशेला ठेवावे.
(5 / 7)
घड्याळ दक्षिण दिशेला चुकूनही ठेवू नये, घड्याळ दक्षिण दिशेला ठेवल्यास वाईट परिणाम मिळतील. आपल्या वास्तूवर याचा वाईट परिणाम होईल, त्यामुळे काळजी घ्यावी.
(6 / 7)
घड्याळ भिंचीवर लावताना नेहमी लक्षात ठेवावे की घराच्या दारात घड्याळ टांगू नका. हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे, असे वास्तुशास्त्रानुसार सांगीतले जाते.
(7 / 7)
वास्तूनुसार घरात कधीही तुटलेली फुटलेली वस्तू ठेऊ नये. वास्तुशास्त्रानुसार तुटलेले घड्याळ घरात ठेवू नये, वास्तुशास्त्र सांगते की अशा घड्याळांमुळे घरात दुर्दैव येऊ शकते.
(8 / 7)
वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी फिकट रंगाची घड्याळे असावीत. घरात गडद रंगाचे घड्याळ असल्यास नकारात्मकता येईल असे वास्तुशास्त्र सांगते. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)