मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips : अंगणात लिंबाचं झाड असणं शुभ की अशुभ? पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र

Vastu Tips : अंगणात लिंबाचं झाड असणं शुभ की अशुभ? पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र

Feb 24, 2024 07:33 PM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

Vastu Tips on plants placement : तुमच्या घरी लिंबाचे रोप असेल किंवा अंगणात लिंबाचे झाड असेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? ते कोणत्या दिशेला ठेवावं? जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार…

वास्तुशास्त्रात, प्रत्येक गोष्टीचे वेगळे महत्त्व सांगण्यात आलं आहे. वास्तूच्या जागेला आणि दिशेला या शास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही वस्तू कोणत्या दिशेला असेल तर आर्थिक सुबत्ता येईल आणि कुठे असेल तर वास्तुदोषाला कारण ठरेल हे या शास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, जाणून घेऊया घराच्या अंगणात लिंबाचं झाड असणे शुभ की अशुभ?
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

काटे असलेलं झाड फारसं शुभसूचक नसतं असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. लिंबाचं झालं हे काटे असलेलं आणि लिंबू हे चवीसाठी आंबट असतं. दुसरीकडं लिंबू हे आरोग्यदायी आणि स्वच्छतेसाठी उपयुक्त मानलं जातं. त्यामुळं लिंबाच्या झाडाबद्दल दोन वेगवेगळे प्रवाद आहेत. काही लोक हे झाड शुभ मानतात तर काही जण अशुभ. मात्र, हे झाड नेमकं कोणत्या दिशेला असावं याबाबत वास्तुशास्त्रात काही मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

अनेकजण घरातील बागेत लिंबाचं रोपटं पुरणं पसंत करतात. असं करताना चुकूनही हे रोपटं नैऋत्य दिशेला पुरू नका. यामुळं अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

लिंबाची झाडं भाग्यदायी असतात. त्यातून समृद्धी येते. घरात आनंदाचं वातावरण राहतं. घराची ऊर्जा टिकून राहते असं काहींना वाटतं. लिंबाचं झाड हे यश आणि समृद्धीचं प्रतीक देखील मानलं जातं. कुटुंबात सुसंवाद राखण्यासाठी आणि ते प्रजननक्षमतेचं प्रतीक देखील मानलं जातं.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

घरामध्ये लिंबाचं झाड असणं हे कुटुंबातील सर्व सदस्यांमधील चांगल्या संबंधांचे प्रतीक मानलं जाते. हे झाड असल्यास घर धनधान्यानं भरलेलं राहतं, असं वास्तुशास्त्र सांगतं.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

घराच्या उजव्या बाजूला लिंबाचं झाड असल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होतो. त्यामुळं वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड घराच्या उजव्या बाजूला ठेवावं...(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती वास्तुशास्त्रावर आधारीत आहे. ही माहिती पूर्णपणे अचूक आहे असा आमचा दावा नाही. अधिक माहितीसाठी कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

इतर गॅलरीज