वास्तुशास्त्रानुसार, घरासमोर नारळाचे झाड असणे म्हणजे देवी लक्ष्मीची उपस्थिती होय. मात्र, नारळाचे झाड योग्य ठिकाणी नसल्यास घराच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. या नारळाच्या झाडासंबंधी काही वास्तु टिप्स घरामध्ये आर्थिक समृद्धी वाढवण्यास मदत करतात. चला तर पाहूया, घरामध्ये कुठे नारळाचे झाड लावल्यास सुख-समृद्धी, धन-संपत्ती आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
आर्थिक परिस्थिती सुधारेल
वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्याही सदस्याला काम किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असल्यास ती नारळाच्या झाडाच्या उपस्थितीने दूर होते. जर तुम्ही तुमच्या घरातील बागेत नारळाचे झाड लावले तर तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशाची चणचण दूप होईल.
नारळाचे झाड कोणत्या दिशेला लावणे शुभ -
वास्तुशास्त्रानुसार कोणतेही नारळाचे झाड सुख-समृद्धीचे प्रतीक असते. हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावल्यास त्याचे चांगले फळ मिळते. घराच्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला नारळाची झाडे लावणे खूप शुभ असते असे अनेकजण सुचवतात. पण हे झाड तुमच्या घरात येणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात अडथळा निर्माण करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल तर -
असे म्हटले जाते की जर अनेक दिवसांपासून घरात एखाद्या गोष्टीची समस्या असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते. दरम्यान, घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर, पूर्व आणि ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे, याची खात्री करावी.