कला, विद्या आणि बुद्धीची देवता सरस्वती देवीचा आशीर्वाद ज्या व्यक्तीला लाभतो, तो आपल्या मनाच्या सामर्थ्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो. आई शारदाच्या उपासनेमुळे अभ्यासात लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. वसंत पंचमी अर्थात सरस्वती पूजा हा सण विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणाशी संबंधित संस्थांसाठी खूप खास असतो. रविवार २ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंत पंचमी आहे.
ज्यांना वसंत पंचमीला देवी सरस्वतीला प्रसन्न करायचे आहे आणि ज्ञानाचा आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांनी देवीची आवडती फुले पूजेत अवश्य ठेवावीत. आपण देवी शारदाची आवडती फुले अर्पण करतो तेव्हा देवी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. अशातच जाणून घेऊया सरस्वती देवीची आवडती फुलं कोणती ते.
शास्त्रानुसार देवी सरस्वतीला पांढरा आणि पिवळा रंग खूप प्रिय आहे, म्हणून देवीच्या पूजेमध्ये पिवळी आणि पांढरी फुले अर्पण करण्याचा प्रयत्न करा, आणि ही फुले ताजी असावीत याची काळजी घ्या.
सरस्वती पूजेदरम्यान सरस्वती मातेला पांढरी आणि पिवळी फुले अर्पण करा. गुलाब, कन्हेर आणि झेंडूची फुले सरस्वती देवीला खूप प्रिय आहेत असे सांगितले जाते.
प्रेम आणि भक्तीचे प्रतीक असलेले चमेलीचे फूल देवी मातेला अर्पण केले जाऊ शकते. देवी सरस्वतीला चमेलीची फुले अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते. देवी सरस्वतीला अपराजिताचेही फुले अर्पण करता येतील, हे शुभ मानले जाते.
हिवाळ्यात झेंडूची फुले सुंदर फुलतात, त्यामुळे तुम्ही झेंडूपासून बनवलेल्या माळा देवीला अर्पण करू शकता. झेंडूची फुले सहज उपलब्ध होतात, त्यामुळे या फुलाने आपण देवी सरस्वतीची सहज पूजा करू शकता.
सरस्वती देवीच्या पूजेमध्ये केतकीची फुले ठेवल्यास सावधगिरी बाळगावी. देवी-देवतांच्या पूजेच्या वेळी पूजेच्या साहित्यात केतकीफुलांचा समावेश करण्यास किंवा देवीला अर्पण करण्यास मनाई आहे. अशा वेळी देवी सरस्वतीच्या पूजेमध्ये केतकीची फुले ठेवू नका.