सरस्वती पूजनाचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा विशेष दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो. वसंत पंचमीचा दिवस देवी सरस्वतीच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने तिचे आशीर्वाद आणि शिक्षणात यश मिळते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पाचवी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा हा सण १४ फेब्रुवारी २०२४ रोजी साजरा केला जाणार आहे.
सरस्वती पूजनाची तारीख आणि वेळ:
पंचमी तिथीची सुरुवात – १३ फेब्रुवारी दुपारी ०२:४१ पासून होईल तर पंचमी तिथीची समाप्ती - १४ फेब्रुवारी दुपारी १२:९ पर्यंत होईल.
पूजेची शुभ वेळ - १४ फेब्रुवारी सकाळी ६ वाजून १७ मिनिटे ते दुपारी १२ वाजून १ मिनिटापर्यंत.
हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो. या दिवशी लोक थंडीच्या ऋतूला निरोप देतात. भारतातील अनेक भागात लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि देवी सरस्वतीची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात.
या दिवशी लोक शाळा, घरे आणि शैक्षणिक संस्थांसारख्या ठिकाणी देवी सरस्वतीच्या मूर्तीची स्थापना करतात आणि तिची विशेष पूजा करतात. या दिवशी सरस्वती देवीला पुष्पहार अर्पण करतात. यादिवशी विशेष मंत्रोच्चार, पिवळ्या तांदळाचा नैवेद्य, सरस्वती वाचन इत्यादी केले जाते.
(छायाचित्र सौजन्य एपी)
देवी मातेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी भक्तांनी पंचामृताने भक्तीभावाने अभिषेक करावा. वसंत पंचमी निमित्त आपली शैक्षणिक व धार्मिक पुस्तके मातेला अर्पण करा. असे केल्याने ज्ञान प्राप्त होते.
वसंत पंचमीचा दिवस शालेय शिक्षण, संगीत, करिअर आणि नोकरी सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो. यादिवशी सौभाग्याच्या वस्तू देवी सरस्वतीला समर्पित कराव्या. या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या वस्तू, पिवळी साडी आणि पिवळी फुले अर्पण करा. या विशेष दिवशी शाळा, शैक्षणिक विद्यापीठे अशा विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
(फोटो सौजन्य AFP)