Varun Dhawan Upcoming Films: वरुण धवन हा बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. तो नेहमीच आपला अभिनय सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतो. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बवाल’ या चित्रपटात वरुण शेवटचा दिसला होता. यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसला.
(1 / 8)
वरुण धवनकडे चित्रपटांची मोठी रांग आहे, जे लवकरच रिलीज होणार आहेत. अनेक चित्रपटांशिवाय तो वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. चला तर मग एक नजर टाकूया वरुणच्या आगामी चित्रपटांवर…(instagram)
(2 / 8)
लोकप्रिय चित्रपट निर्माते ॲटली यांचा चित्रपट ‘बेबी जॉन’ या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत वामिका गब्बी आणि कीर्ती सुरेश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून त्याला खूप पसंती मिळाली आहे.(instagram)
(3 / 8)
वरुणची ‘सिटाडेल हनी बनी’ ही वेब सीरिज समंथा रुथ प्रभूसोबत येत आहे. ही सीरिज प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या सीरिजबद्दल दोघेही खूप उत्सुक आहेत. कारण, ही हॉलिवूड सीरिज ‘सिटाडेल’ची भारतीय आवृत्ती आहे.(instagram)
(4 / 8)
वरुण धवनच्या जान्हवी कपूरसोबत ‘सनी संस्कारीकी तुलसी कुमारी’मध्ये देखील दिसणार आहे. वरुण आणि जान्हवीने यापूर्वी ‘बवाल’ या चित्रपटात काम केले असून, त्यांच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले आहे.(instagram)
(5 / 8)
वरुण लवकरच ‘बॉर्डर २’ या चित्रपटात दिसणार आहे. सनी देओलच्या बॉर्डर या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागात वरुण आणि दिलजीत दोसांझही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.(instagram)
(6 / 8)
वरुण आणि क्रिती सेनच्या ‘भेडिया’ या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता त्याचा दुसरा भागही येणार आहे. मात्र, त्याच्या कास्ट आणि रिलीज डेटबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.(instagram)
(7 / 8)
काही दिवसांपूर्वीच बोनी कपूर यांनी घोषणा केली होती की त्यांच्या ‘नो एंट्री’ चित्रपटाचा सीक्वल ‘नो एन्ट्री २’ येत आहे. यामध्ये वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.(instagram)
(8 / 8)
वरुण धवनचा आणखी एक चित्रपट म्हणजे ‘है जवानी तो इश्क होना है’ देखील येणार आहे. त्याचे वडील डेव्हिड धवन हा चित्रपट बनवत आहेत. पुढच्या वर्षी रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.(instagram)