Valentine Week Full List: फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. या महिन्यात ७ ते १४ तारीख लव्ह बर्ड्ससाठी खूप खास असतात. येथे जाणून घ्या या स्पेशल व्हॅलेंटाईन वीकबद्दल.
(1 / 9)
व्हॅलेंटाईन वीक २०२४ संपूर्ण यादी - ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. लोक या आठवड्याला लव्ह बर्ड्सचा सण, प्रेमाचा उत्सव म्हणतात. येथे जाणून घ्या या आठवड्यात कधी कोणता दिवस येणार आहे.
(2 / 9)
७ फेब्रुवारी - रोझ डे ७ फेब्रुवारी रोजी रोझ डे पासून व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेशन सुरू होते. या दिवशी लोक त्यांच्या क्रश किंवा पार्टनरला गुलाबाचे फूल देतात.
(3 / 9)
८ फेब्रुवारी- प्रपोज डेरोझ डे नंतर प्रपोज डे येतो. प्रपोज डे ला लोक त्यांच्या पार्टनरसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली देतात किंवा त्यांच्या क्रशला त्यांचे प्रेम व्यक्त करतात.
(4 / 9)
९ फेब्रुवारी - चॉकलेट डे९ फेब्रुवारी रोजी चॉकलेट साजरा केला जातो. या दिवशी आपल्या पार्टनरला किंवा आपल्या क्रशला त्यांची आवडती चॉकलेट द्या.
(5 / 9)
१० फेब्रुवारी - टेडी डेव्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. तुमच्या जोडीदाराला प्रभावित करण्यासाठी आणि त्यांच्यावरील तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना एक टेडी गिफ्ट द्या.
(6 / 9)
११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देऊ शकता.
(7 / 9)
१२ फेब्रुवारी - हग डे व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी हग डे असतो. या दिवशी आपल्या प्रियजनांना मिठी मारून भावना व्यक्त केल्या जातात.
(8 / 9)
१३ फेब्रुवारी - किस डे १३ फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो. प्रेमात पडलेले लोक या दिवशी किस करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करतात. तुमच्या पार्टनरप्रती आपुलकी दाखवण्यासाठी किस केले जाते.
(9 / 9)
१४ फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डेजगभरातील लव्हर्स १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. या दिवशी ते एकमेकांना डेटवर घेऊन जातात आणि एकमेकांना गिफ्ट देऊन आनंद साजरा करतात.