कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवसाला वैशाख पौर्णिमा म्हणतात. हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा तिथीला स्नान आणि दानाच्या शुभ मुहूर्ता व्यतिरिक्त अनेक शुभ योग आहेत, बुद्ध पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमेचा शुभ योगाची वेळ जाणून घ्या.
वैशाख पौर्णिमा २०२४ ची तारीख -
वैशाख पौर्णिमा बुधवार, २२ मे रोजी संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होते आहे. या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी गुरुवारी २३ मे रोजी संध्याकाळी ७:२२ वाजता होईल. उदया तिथीनुसार, वैशाख पौर्णिमा २३ मे २०२४ रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाईल.
वैशाख पौर्णिमेला स्नान आणि दान वेळ -
शास्त्रानुसार वैशाख पौर्णिमेची तिथी अत्यंत शुभ आहे. या दिवशी आंघोळ करणे आणि एखाद्याला काहीतरी दान करणे शुभ असते असे शास्त्र सांगते. वैशाख पौर्णिमेचा ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:०४ ते ४:४५ पर्यंत असेल. या दिवशी नदीत स्नान करणे शुभ मानले जाते.
वैशाख पौर्णिमा शुभ योग-
या वैशाख पौर्णिमेला बुद्धपौर्णिमा असेही म्हणतात. वैशाख पौर्णिमेला गजलक्ष्मी राजयोगासह अनेक शुभ योग असणार आहे. या पौर्णिमा तिथीला, २३ मे रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी, २४ मे रोजी सकाळी ५:२६ वाजेपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. तसेच या दिवशी २३ मे रोजी दुपारी १२:०० ते २४ मे रोजी सकाळी ११:२२ पर्यंत शिवयोग आहे.
((Pixabay))