मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Makar Sankranti 2024: मकर संक्रांती साजरी करण्यामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Makar Sankranti 2024: मकर संक्रांती साजरी करण्यामागचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Jan 09, 2024 06:32 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Makar Sankranti 2024 Why Is Celebrated: नवीन वर्षाचा पहिला गोडधोडाचा सण म्हणजे मकर संक्रांती आहे. मकर संक्रांत का साजरी केली जाते? त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घ्या.

यंदा मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलण्याला संक्रांत म्हणतात. एक संक्रांती आणि दुसरी संक्रांती दरम्यानचा काळ म्हणजे सौर महिना. वर्षभरात एकूण १२ संक्रांत येतात, पण मकर संक्रांत ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. पौष महिन्यात, जेव्हा उत्तरायणानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा हा प्रसंग देशातील विविध राज्यांमध्ये विविध नावाने साजरा केला जातो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

साधारणपणे, भारतीय दिनदर्शिकेतील सर्व तारखा चंद्राच्या हालचालीवर आधारित असतात, परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या हालचालीवर आधारित असते. मकर संक्रांतीचे अनेक धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर दान करणे शुभ मानले जाते. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपून धनुर्मासामुळे जी शुभ कर्मे होत नाही ती पुन्हा सुरू होतात. मकर संक्रांतीचे केवळ धर्मातच नव्हे तर विज्ञानातही मोठे महत्त्व आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्त्व: ग्रहांचा अधिपती, सूर्य देव सर्व १२ राशींवर प्रभाव टाकतो, परंतु त्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश खूप महत्त्वाचा आहे. सहा महिन्यांच्या अंतराने सूर्य या दोन्ही राशींमध्ये प्रवेश करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलायचे झाले तर, पृथ्वीचा अक्ष २३.५ अंश झुकल्यामुळे, सूर्य सहा महिने उत्तर गोलार्धाजवळ आणि उर्वरित सहा महिने दक्षिण गोलार्धाजवळ असतो.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

मकर संक्रांतीच्या आधी, सूर्य दक्षिण गोलार्धा जवळ असतो, म्हणजे उत्तर गोलार्धापासून तुलनेने दूर असतो, त्यामुळे उत्तर गोलार्धात रात्री मोठी आणि दिवस लहान असतात आणि हिवाळा असतो. त्याच वेळी, मकर संक्रांतीपासून, सूर्य उत्तर गोलार्धाकडे जाऊ लागतो, म्हणून या दिवसापासून उत्तर गोलार्धात रात्र लहान आणि दिवस मोठा होऊ लागतो आणि थंडी कमी होऊ लागते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

मकरसंक्रांतीचे धार्मिक महत्त्व: मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे, सूर्यपूजा आणि देवस्थानांना दान करणे याला महत्व आहे. या निमित्ताने दिलेले दान शतपटीने परत येते असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळमिश्रित पाण्यात अंघोळ केल्याने आणि तिळाच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने पुण्य प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो, असे सांगितले जाते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

मकरसंक्रांतीचे आयुर्वेदिक महत्त्व : धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वासोबतच मकर संक्रांतीचे आयुर्वेदिक महत्त्वही आहे. या दिवशी तांदूळ, बाजरी, तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्न खाल्ले जाते. तीळ आणि गुळापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्यात सुधारणा होते आणि रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

मकरसंक्रांतीचे आयुर्वेदिक महत्त्व : धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वासोबतच मकर संक्रांतीचे आयुर्वेदिक महत्त्वही आहे. या दिवशी तांदूळ, बाजरी, तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्न खाल्ले जाते. तीळ आणि गुळापासून बनवलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्यात सुधारणा होते आणि रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होते.

WhatsApp channel

इतर गॅलरीज