४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र दिवस. दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त फटाक्यांची आतषबाजी, परेड, बार्बेक्यूज, कॉन्सर्ट, बेसबॉल गेम्स, कार्निव्हल आणि अनेक उपक्रम साजरे करत अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
(1 / 5)
अमेरिकेने आज ४ जुलैरोजी आपला २४६ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. ४ जुलैचा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन म्हणून ओळखला जाणारा हा दिवस आहे. जेव्हा अमेरिकेने ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्याची घोषणा केली होती.(AP)
(2 / 5)
हंटिंग्टन बीचचा ४ जुलैचा उत्सव, सिटी आॅफ बेलायर आॅफ इंडिपेंडन्स परेड अँड फेस्टिव्हल आणि डेलावेअर फटाक्यांची आतषबाजी आणि परेड या दिवशी आयोजित केली जाते.(AP)
(3 / 5)
अनेकांसाठी ४ जुलै हा राजकीय मतभेद बाजूला ठेवून ऐक्याचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. हा दिवस इतिहासाच्या सर्वाधिक काळ टिकणाऱ्या लोकशाहीला जन्म देणाऱ्या क्रांतीचे प्रतिबिंब आहे.(AP)
(4 / 5)
स्वातंत्र्यदिनी ३ जुलै रात्री सेंट जोसेफ नदीमध्ये मिच येथे फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. या वेळी संपूर्ण आसमंत हे फटाक्यांच्या रोषणाईने बहरले होते.(AP)
(5 / 5)
फिलाडेल्फियातील फिलाडेल्फिया फिलीस आणि सेंट लुईस कार्डिनल्स यांच्यातील बेसबॉल खेळानंतर सिटिझन्स बँक पार्कवर स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा उत्सव साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.(AP)