इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी अमेकरिकेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठे निषेध आंदोलन केले. अनेक विद्यार्थी हे रस्त्यावर आले असून इस्रायल विरोधी घोषणा दिल्या. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्येच टेंटमध्ये राहून हे आंदोन सुरू केले आहे. या विद्यार्थी निदर्शकांना हाकलून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे. काही ठिकाणी विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात झडप देखील झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. ऑस्टिन, टेक्सास येथे बुधवारी टेक्सास विद्यापीठात पॅलेस्टिनी समर्थकांनी निषेध आंदोलन केले. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. काही पोलिस हे घोड्यांवरुन येत निदर्शक विद्यार्थ्यांना पांगवले.
(AP)ऑस्टिन, टेक्सास येथे टेक्सास विद्यापीठात पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थी निदर्शने करत आहेत. बुधवारी किमान दोन विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये आंदोलन आणि पोलीसात झडप झाली. तर दुसऱ्या विद्यापीठात आंदोलक विद्यार्थ्यांनी पुढील काही दिवस कॅम्पस बंद ठेवला आहे.
(AP)न्यूयॉर्क येथील अमेरिकेच्या मॉर्निंगसाइड हाइट्स शेजारच्या कोलंबिया विद्यापीठातील छावणीत पॅलेस्टिनी समर्थक आणि निदर्शक अमेरिकेच्या हाऊसचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी बुधवारी कोलंबिया विद्यापीठाचे कुलगुरू मिनोचे शफिक यांना राजीनामा देण्याचे आवाहन केले. तसेच कॅम्पसमधील ज्यू विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
(Bloomberg)टेक्सास येथे इस्रायल आणि पॅलेस्टिनी इस्लामी गट हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान टेक्सास विद्यापीठात पॅलेस्टिनी समर्थक आंदोलकांनी निदर्शने करणाऱ्या काहींना अटक केली.
(REUTERS)ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील इस्रायल आणि पॅलेस्टिनी इस्लामी गट हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरुन आंदोलन करणाऱ्या पॅलेस्टिनी समर्थक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.
(REUTERS)टेक्सास विद्यापीठात पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांना पोलिसांनी कॅम्पसच्या बाहेर काढले. कोलंबिया विद्यापीठात गेल्या आठवड्यात १०० हून अधिक निदर्शकांच्या अटकेनंतर इस्रायल-हमास युद्धावरील विद्यार्थ्यांची निदर्शने कॉलेज कॅम्पसमध्ये वाढली आहेत.
(AP)टेक्सास विद्यापीठात पॅलेस्टिनी समर्थक निदर्शक इस्रायल विरोधी घोषणा देत असतांना. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
(AP)टेक्सास विद्यापीठात प्रो-पॅलेस्टिनी समर्थकांनी अमेरिकी सरकारचा आणि इस्रायलचा निषेध केला. कोलंबिया विद्यापीठात गेल्या आठवड्यात १०० हून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली. यानंतर हे आंदोलन अधिक चिघळले.
(AP)न्यूयॉर्क शहरातील वॉशिंग्टन स्क्वेअर पार्क येथे २३ एप्रिलला न्यूयॉर्क विद्यापीठाच्या (NYU) विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी गाझामधील इस्रायलच्या युद्धाच्या निषेधार्थ सहभागी होत मोर्चा काढला. गाझामधील युद्धविराम आणि त्यांच्या शाळांना इस्रायलपासून दूर ठेवण्यासाठी देशभरातील महाविद्यालयांतील विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
(Getty Images via AFP)