बॉलिवूड अभिनेत्री ते राजकारणी उर्मिला मातोंडकर आज (४ फेब्रुवारी) आपला ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिला मातोंडकर हिने बालकलाकर म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते.
आपल्या दमदार अभिनयाने आणि निरागस सौंदर्याने उर्मिला मातोंडकर हिने सगळ्यांनाच भुरळ घातली होती. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'रंगीला' हा चित्रपट उर्मिला मातोंडकरच्या करिअरसाठी महत्त्वाचा चित्रपट ठरला. यानंतर उर्मिलाला तिच्या करिअरमध्ये खूप यश मिळाले.
उर्मिला मातोंडकर ही २०१९ राजकारणाच्या रिंगणात उतरली होती. तिने उत्तर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, तिला ही निवडणूक जिंकता आली नाही. निवडणुकीसाठी उर्मिलाने जे प्रतिज्ञापत्र भरले होते, त्यात ६८.२८ कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.
उर्मिला मातोंडकरकडे ४०.९३ कोटी रुपये चल आणि २७.३४ कोटी रुपयांची अचल संपत्ती असल्याचे तिने या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. तर, उर्मिला मातोंडकर हिच्याकडे १ कोटी २७ लाख ९५ हजार रुपयांचे हिऱ्याचे दागिने आहेत.