अभिनेत्री उर्फी जावेद ही अतरंगी ड्रेससाठी विशेष ओळखली जाते. ती कशा पासून ड्रेस तयार करेल याचा नेम नाही. नुकताच उर्फीने १०० किलोचा ड्रेस परिधान करुन फोटोशूट केले आहे. तिच्या या ड्रेसची सर्वत्र चर्चा रंगली आहे. चला पाहूया उर्फीचा १०० किलोचा ड्रेस…
उर्फीने निळ्या रंगाच्या नेटचा ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस खूप लांबलचक असल्याचे दिसत आहे. या ड्रेसला उर्फीने हार्टचा शेप दिला आहे. तसेच वेगळी अशी हेअर स्टाइल केली आहे.
उर्फीच्या या ड्रेसचे वजन १०० किलो आहे. तिला या ड्रेसमध्ये चालणे देखील कठीण झाले आहे. उर्फी एका छोट्या टेंपोमध्ये येते आणि मग उभी राहते.
या ड्रेसमध्ये फोटोशूट करण्यासाठी उर्फीने पोलिसांची विशेष परवानगी घेतली आहे. त्यानंतरच तिने हे फोटोशूट केले आहे.