Upcoming Films & Series: २२ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत हे सहा चित्रपट व वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.
(1 / 7)
ऑगस्ट संपायला अजून 9 दिवस बाकी आहेत आणि या नऊ दिवसात काही नवे चित्रपट व वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
(2 / 7)
बॉक्स ऑफिसवर ६४६.१३ कोटींची कमाई केल्यानंतर प्रभासचा 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट आता ओटीटीला टक्कर देणार आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
(3 / 7)
'शेखर होम्स'नंतर आता केके मेननची नवी वेब सिरीज येत आहे. या वेब सीरिजचे नाव 'मुर्शिद' असून ती ३० ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
(4 / 7)
उर्फी जावेदच्या जीवनावर आधारित 'फॉलो कर लो यार' ही वेबसिरीज ओटीटीवर धडकणार आहे. २३ ऑगस्ट रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
(5 / 7)
विजय वर्मा यांची 'आईसी ८१४: द कंधार हाईजॅक' ही वेब सीरिज २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
(6 / 7)
धनुषचा 'रायन' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. २३ ऑगस्ट रोजी हा चित्रपटश अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.