Upcoming Flagship Smartphones: हे वर्ष संपण्यासाठी चार महिने शिल्लक आहे. यापूर्वी आयफोनसह अनेक स्मार्टफोन निर्माते त्यांचा फ्लॅगशिप स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार आहेत.
(1 / 5)
अॅपल ९ सप्टेंबरला आयफोन १६ सीरिज लॉन्च करणार आहे. आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स मॉडेल लॉन्च केले जातील. नवीन आयफोनमध्ये नवीन शक्तिशाली प्रोसेसर, कॅमेरा अपग्रेड आणि एआय फीचर्स असतील. (Hindustan Times Tech)
(2 / 5)
वनप्लस १२ प्रचंड हिट झाला आहे. कंपनी वनप्लस १३ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. वनप्लस १३ सीरिज यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या १३ सीरिजमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ४ प्रोसेसरसह बरेच अपग्रेड्स असतील. (OnePlus)
(3 / 5)
विवो एक्स २०० सीरिजचे फ्लॅगशिप स्मार्टफोन याच वर्षी लॉन्च करण्यात येणार आहेत. या सीरिजमध्ये विवो एक्स २००, विवो एक्स २०० प्लस आणि विवो एक्स २०० प्रो फोनचा समावेश आहे. विवो एक्स २०० प्रो २०० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा घेऊन येणार असल्याची चर्चा आहे. हे मोबाइल फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स आणि प्रीमियम फ्रीचर्ससोबत येणार आहेत. (Vivo)
(4 / 5)
टेक्नो टेक्नो फँटम व्ही फोल्ड २ आणि व्ही फ्लिप २ फ्लॅगशिप फोल्डेबल फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे मोबाइल लवकरच भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. हे मोबाइल मीडियाटेक डिमॅन्सिटी ९०००+ आणि डिमॅन्सिटी ८०२० च्या दमदार प्रोसेसरसह येतील. (Amazon)
(5 / 5)
ओप्पो फाइंड एक्स ८ फ्लॅगशिप सीरिज यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात लॉन्च होणार आहे. या सीरिजमध्ये ओप्पो फाइंड एक्स ८, ओप्पो फाइंड एक्स ८ प्रो आणि ओप्पो फाइंड एक्स ८ अल्ट्रा चा समावेश असेल. अल्ट्रा व्हेरियंटमध्ये मीडियाटेक डायमॅन्सिटी ९४०० प्रोसेसर असेल. तिन्ही मॉडेल्स प्रीमियम फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह येतील. (HT Tech)