सॅमसंग गॅलेक्सी एस २४ एफई: सॅमसंगने नुकतीच या फोनची अधिकृत घोषणा केली आहे. भारतात याची विक्री ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सॅमसंगचा हा फोन ८ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजसोबत येतो. प्रोसेसर म्हणून यात तुम्हाला एक्सीनॉस २४०० ई चिपसेट पाहायला मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. आयपी६८ रेटिंग असलेल्या या फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ४७०० एमएएच ची आहे. ही बॅटरी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
लावा अग्नी ३: लावाचा हा फोन ४ ऑक्टोबररोजी भारतात लाँच होणार आहे. फोनमध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशन सह ६.७८ इंचाचा डिस्प्ले आणि १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट मिळू शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये डायमेंसिटी ७३०० चिपसेट देऊ शकते. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी तुम्हाला ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. फोनची बॅटरी ५००० एमएएच ची असू शकते, जी ६६ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
इन्फिनिक्स झिरो फ्लिप: इन्फिनिक्सचा हा फोन देखील याच महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन काही देशांमध्ये दाखल करण्यात आला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर इन्फिनिक्सच्या या फोनमध्ये तुम्हाला ६.९ इंचाचा एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले पाहायला मिळेल. हे १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करते. फोनचा कव्हर डिस्प्ले ३.६४ इंचाचा आहे. या फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजसह डायमेंसिटी ८०२० प्रोसेसर आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. तर याचा सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे.