नोव्हेंबरमध्ये एक-दोन नव्हे तर आठ चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे हे छोटे चित्रपट नाहीत, हे बड्या स्टार्सचे चित्रपट आहेत. आता हे सिनेमे कोणते चला जाणून घेऊया…
'भूल भुलैया 3' या हॉरर कॉमेडी चित्रपटाने नोव्हेंबरची सुरुवात होणार आहे. कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
बॉबी देओलचा साऊथ चित्रपट 'कंगुआ' 14 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात सूर्याही आहे.
विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपटही नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, अनुपम खेर, नीना गुप्ता आणि पंकज त्रिपाठी यांचा 'मेट्रो...इन दिन' हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.