फेब्रुवारी महिन्यात सहा मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांची ही यादी आहे. या यादीमध्ये चित्रपटाच्या रिलीज तारखेपासून चित्रपटाच्या स्टार कास्टपर्यंत सर्व प्रकारची माहिती आहे.
'मेरे पति की बीवी' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होऊ शकतो. या चित्रपटात अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.
'साको ३६३' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात बिश्नोई महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. अमृता देवी जिने खेजरली गावातील वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी जोधना राज्याच्या दिवाणांशी लढा दिला. हा चित्रपट २८ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जुनैद खान आणि खुशी कपूरचा 'लव्हयापा' चित्रपट ७ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवाचा 'बॅडअस रवी कुमार' चित्रपट ७ फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात हिमेश रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात हिमेशचा उग्र अवतारही लोकांना पाहायला मिळणार आहे.
'इन गली में' हा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन अविनाश दास यांनी केले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते जावेद जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह आणि भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानी दिसणार आहेत.