फेब्रुवारीमध्ये ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार, झी ५ आणि प्राइम व्हिडिओवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांची आणि मालिकांची नावे येथे पहा.
जिओ स्टुडिओने सान्या मल्होत्राच्या 'मिसेस' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारीपासून 'झी ५'वर प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरती कडव यांनी केले आहे. या चित्रपटात सान्या व्यतिरिक्त निशांत दहिया, कंवलजीत सिंग, अपर्णा घोषाल, मृणाल कुलकर्णी आणि नित्या मॉयल मुख्य भूमिकेत आहेत.
बोमन इराणी दिग्दर्शित 'द मेहता बॉईज' ७ फेब्रुवारी रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात बोमन इराणी, अविनाश तिवारी, श्रेया चौधरी आणि पूजा सरूप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
श्वेता बसू प्रसाद आणि आशिम गुलाटी यांची विनोदी सीरिज 'उप्स अब क्या?' २० फेब्रुवारीपासून हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. या सीरिजमध्ये श्वेता आणि आशिम व्यतिरिक्त जावेद जाफरी, सोनाली कुलकर्णी, अपरा मेहता, अभय महाजन आणि एमी आयला हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
व्यंकटेश दग्गुबती यांचा चित्रपट 'संक्रांती स्थानम' आता थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटीवर रिलीज होणार आहे. OTTplayच्या रिपोर्टनुसार, 'संक्रांती स्थानम' ओटीटीवर फेब्रुवारीच्या सुरुवातीला रिलीज होऊ शकतो.
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'गेम चेंजर' ही पॉलिटिकल ॲक्शन फिल्म रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट १४ फेब्रुवारीच्या आसपास ओटीटीवर धडक देऊ शकतो. या चित्रपटात राम चरण व्यतिरिक्त कियारा अडवाणी, जयराम आणि एसजे सूर्या मुख्य भूमिकेत आहेत.