२०२४ हे वर्ष आतापर्यंत बॉलिवूडसाठी खूप छान गेलं आहे. ‘मुंज्या’पासून ते ‘शैतान’ आणि ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीला आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट मिळाले आहेत. पण, हा फक्त ट्रेलर होता, खरी मजा तर आता येणार आहे. चला तर मग, जाणून घेऊया त्या काही बहुप्रतीक्षित चित्रपटांबद्दल, जे या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट 'स्त्री २' या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर हिट ठरला होता आणि आता दुसरा भाग यावर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
नीरज पांडे दिग्दर्शित 'औरों में कहाँ दम था' हा चित्रपट जाहीर होताच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. हा चित्रपट सतत चर्चेत आहे. अजय देवगण आणि तब्बूचा हा चित्रपट २ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
'भूल भुलैया' या चित्रपटाचे यापूर्वीचे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरले असून, आता लोक तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट यावर्षी १ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
पुष्पाचा स्वॅग चित्रपटगृहांमध्ये इतका लोकप्रिय झाला की, लोकांनी कोरोनाचीही पर्वा न करता चित्रपट पाहिला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ६ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. अंदाजे ५०० कोटी रुपये खर्चून बनलेला हा चित्रपट आतापर्यंत दोनदा पुढे ढकलण्यात आला आहे.
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधून आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणच्या ‘सिंघम’ या सुपरहिट चित्रपट सीरिजमधी पुढचा चित्रपट 'सिंघम अगेन' बनवण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च आला आहे. यावेळी, १ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात दीपिका आणि टायगर देखील दिसणार आहे.