Upcoming Action Films : ‘छावा’ ते ‘टायगर व्हर्सेस पठान’; प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत ‘या’ अ‍ॅक्शन चित्रपटांची!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Upcoming Action Films : ‘छावा’ ते ‘टायगर व्हर्सेस पठान’; प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत ‘या’ अ‍ॅक्शन चित्रपटांची!

Upcoming Action Films : ‘छावा’ ते ‘टायगर व्हर्सेस पठान’; प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत ‘या’ अ‍ॅक्शन चित्रपटांची!

Upcoming Action Films : ‘छावा’ ते ‘टायगर व्हर्सेस पठान’; प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत ‘या’ अ‍ॅक्शन चित्रपटांची!

Nov 05, 2024 05:59 PM IST
  • twitter
  • twitter
Upcoming Action Films : अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये ॲक्शन चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात प्रेक्षकांना आणखी काही अप्रतिम ॲक्शन चित्रपट पाहायला मिळणार आहेत. चला तर मग, जाणून घेऊया या चित्रपटांची यादी.
अलीकडच्या काळातील बॉलिवूड चित्रपटांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर ॲक्शन चित्रपटांना खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. याच कारणामुळे 'किंग ऑफ रोमान्स' शाहरुख खानलाही ॲक्शन हिरो म्हणून पडद्यावर परतावे लागले. येत्या काळात अनेक अप्रतिम ॲक्शन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूडच्या मोस्ट अवेटेड हिंदी चित्रपटांची यादी.
twitterfacebook
share
(1 / 7)

हृतिक रोशन आणि साऊथचा सुपरस्टार अभिनेता ज्युनियर एनटीआर यांची जोडी चित्रपटाच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'वॉर २' या चित्रपटाची चाहत्यांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर हिट ठरला होता आणि आता चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
twitterfacebook
share
(2 / 7)

विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात बघायला सगळेच उत्सुक झाले आहेत. चित्रपटातील विकीचा फर्स्ट लूक समोर आला आहे आणि टीझरवरून हे स्पष्ट झाले आहे की, विकी कौशलच्या एंट्रीपासून ते प्रत्येक सीनपर्यंत थिएटरमध्ये जोरात शिट्ट्या वाजणार आहेत.
twitterfacebook
share
(3 / 7)

अंदाजे ३५०कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या 'कंगुवा' या चित्रपटाचे प्रत्येक पोस्टर चाहत्यांच्या मनातील उत्कंठा द्विगुणित करते. या चित्रपटात प्रेक्षकांना अफाट ॲक्शन पाहायला मिळणार आहे.
twitterfacebook
share
(4 / 7)

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा-द राइज' या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता प्रत्येकजण या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट बघत आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले आहे. पण आता ५०० कोटी रुपये खर्चून बनलेला हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)

शाहरुख खान आणि सलमान खान यांना पडद्यावर एकत्र पाहणे, ही चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. ‘पठान’ आणि ‘टायगर-३’मध्ये दोघे एकत्र दिसले तेव्हा प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले होते. आता या दोघांना 'टायगर व्हर्सेस पठान'मध्ये एकत्र आणण्याची चर्चा सुरू आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)

ॲटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'जवान' ब्लॉकबस्टर हिट ठरला होता आणि आता ॲटलीने लिहिलेल्या कथेवर आधारित 'बेबी जॉन' हा चित्रपट थिएटरमध्ये रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज