(1 / 5)मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार, आशयपूर्ण चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रॉडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. आता एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येता आहे. या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीमधील तीन मोठे कलाकार दिसणार आहेत.