Salman Khan Upcoming Movie: सलमान खानचे सध्या सहा चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. हे सहा चित्रपट एकामागून एक चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत.
(1 / 7)
सलमान खानचे चाहते त्याच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरंतर सलमान शेवटचा 2023 साली मोठ्या पडद्यावर दिसला होता. टायगर ३ हा सलमानचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. आता सलमानच्या चित्रपटांविषयी नवे अपडेट समोर आले आहे.
(2 / 7)
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आधी शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण 2' तयार होईल आणि त्यानंतर 'टायगर वर्सेस पठाण'चे शूटिंग सुरू होईल. हा चित्रपट २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
(3 / 7)
सलमान खान सध्या 'सिकंदर' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट ए आर मुरुगदास दिग्दर्शित करत असून या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, सत्यराज आणि प्रतीक बब्बर यांच्या भूमिका आहेत. पुढील वर्षी ईदला हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.
(4 / 7)
'बेबी जॉन'मध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. IMDB च्या रिपोर्टनुसार, त्यात सलमान खान आणि रजनीकांत यांचा कॅमिओ दिसणार आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होऊ शकतो.
(5 / 7)
मिड डेच्या रिपोर्टनुसार, सलमान खान पुढच्या वर्षी 'किक 2'वर काम सुरू करणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
(6 / 7)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पुढील वर्षी सलमान खान आणि करण जोहरच्या 'द बुल' चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
(7 / 7)
सनी देओलने 'सफर'चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात सलमान खानचा एक कॅमिओ आहे आणि हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो.