पुढच्या वर्षी येणाऱ्या चित्रपटांची घोषणा आधीच झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत.
वर्ष २०२५ ची सुरुवात अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' चित्रपटाने होणार आहे. हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत वीर पहाडिया दिसणार आहे.
'स्काय फोर्स'नंतर सनी देओल आणि आमिर खानचा 'लाहोर 1947' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 26 जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
फेब्रुवारी 2025 चा मोस्ट अवेटेड चित्रपट 'रेड 2' 21 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुख दिसणार आहेत.
यानंतर अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा कॉमेडी चित्रपट 'जॉली एलएलबी 3' एप्रिल 2025 मध्ये येणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
'जॉली एलएलबी 3' सोबतच 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' देखील एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि वरुण धवन दिसणार आहेत.