ओप्पो एफ २५ प्रो 5G स्मार्टफोन २९ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतात लाँच होणार आहे. या फोनमध्ये ६.७ इंचाचा १२० हर्ट्झ डिस्प्ले मिळत आहे.
हा फोन अवघ्या १७७ ग्रॅम वजनाचा आहे. ओप्पो एफ 25 प्रो हा आयपी ६५ रेटिंगसह सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे.
(Oppo)एफ 25 प्रो 5G च्या फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेऱ्यांवर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळणार आहे, एआय स्मार्ट इमेज मॅटिंगसह, हे सहज विषय काढण्यास सक्षम करते.