Weather Update : होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान
Maharashtra Weather Update : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.
(1 / 5)
राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात चढ-उतार होत असल्यामुळं त्याचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
(2 / 5)
Weather Update Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुलीवंदन साजरं केलं जात असतानाच आता मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.(HT)
(3 / 5)
maharashtra rain news today : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि नंदूरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी बरसल्या आहेत.(HT)
(4 / 5)
उन्हाळ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. कारण मका, गहू, हरभरा आणि फळबागांचं या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.(HT_PRINT)
(5 / 5)
विदर्भ आणि मराठवाड्यासह पुणे-मुंबईतही ढगाळ वातावरण तयार झालं आहे. आज दुपारी पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती आहे. त्यामुळं आता बदलत्या हवामानामुळं आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.(HT)
इतर गॅलरीज