Eiffel Tower Bomb Threat : जगप्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळं फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे.
(AFP)अज्ञात आरोपीने आयफेल टॉवर उडवून देण्याची धमकी दिली असून त्यानंतर आता पोलिसांनी संपूर्ण पॅरिसमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.
(AFP)आयफेल टॉवर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून तिथं काळासाठी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे.
(AFP)पॅरिसमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. संशयास्पद वस्तू आणि वाहनांची पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.
(AFP)