अल्ट्राव्हायोलेट एफ ७७ सुपरस्ट्रीट भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. स्टँडर्ड व्हेरियंटची किंमत 2.99 लाख रुपये तर रेकॉन व्हेरियंटची किंमत 3.99 लाख रुपये आहे. दोन्ही किंमती इंट्रोडक्टरी आणि एक्स-शोरूम आहेत.
अल्ट्राव्हायोलेट एफ ७७ सुपरस्ट्रीटचे बुकिंग १ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी मार्च २०२५ पासून सुरू होईल.
अल्ट्राव्हायोलेट एफ ७७ सुपरस्ट्रीटमध्ये सध्या स्टँडर्ड म्हणून परफॉर्मन्स पॅक देण्यात आला आहे. पॅकमध्ये डायनॅमिक रेजेनसह १०-लेव्हल रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि अॅडव्हान्स्ड ३-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आले आहे.
या बाईकमध्ये मूव्हमेंट, फॉल अँड टोइंग अलर्ट, रिमोट लॉकडाऊन, क्रॅश अलर्ट, डेली राइड स्टॅट्स आणि अँटी कोलिजन वॉर्निंग सिस्टीम देण्यात आली आहे.
एफ ७७ सुपरस्ट्रीट टर्बो रेड, आफ्टरबर्नर यलो, स्टेलर व्हाईट आणि कॉस्मिक ब्लॅक या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.