
रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या युद्धात रशियापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी एक सौंदर्यवती ब्युटीशियन तरुणी ही युक्रेनच्या लष्करात सामील झाली असून ती एक स्नायपर बनली आहे.
३१ वर्षीय युक्रेनियन ब्युटीशियन इव्हगोनिया एमराल्ड असे या तरुणीचे नाव असून ती आता उत्कृष्ट स्नायपर बनली आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी एव्हगोनिया एमराल्ड ब्युटीशियन होती ती दागिन्यांच्या व्यवसायात काम करत होती.
युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्यानंतर ती सैन्यदलात दाखल झाली. २०२२ मध्ये, एव्हगोनिया एमराल्डने युक्रेनियन सैनिक एव्हगेनी स्टिपन्युकसोबत लग्न देखील केले. या दोघांची ओळख युद्धाच्या वेळी झाली होती. त्यानंतर त्यांनी युद्धभूमितच लग्नगाठ बांधली.
एव्हगोनिया एमराल्डने २०१४ मध्ये रशियाच्या क्रिमियावरील आक्रमणादरम्यान लष्करी प्रशिक्षण घेतलं होतं आणि आता ती एक कुशल स्नायपर बनली असून तिने अनेक रशियन सैनिकांना ठार मारले आहे.
एव्हगोनिया एमराल्ड सैन्य दलातील उत्कृष्ट स्नायपरपैकी एक आहे. एव्हगोनिया एमराल्डला सुरुवातीला लिंगभेदाचाही सामना करावा लागला होता. मात्र, सर्व अडचणींवर मात करत तिने आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे.
युक्रेनचे सैन्यतिला "द पीनिशर" म्हणून संबोधतात. तिने युद्धभूमीत अनेक रशियन सैनिकांना ठार मारले आहे.
एव्हगेनिया एमराल्ड जेव्हा लष्करात दाखल झाली तेव्हा तिला इतर मानवांना मारावे लागेल याचा धक्का बसला होता. पण तिने स्वत: मध्ये बदल करत आता देश रक्षणासाठी सज्ज झाली आहे.
शत्रूचा वेध घेतांना ती कधीही संकोचत नाही. ऑक्टोबर २०२२ मध्ये खार्किवाच्या जंगलात युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या सुरूवातीस भेटलेल्या एका युक्रेनच्या सैनिकाशी तिने युद्धभूमीत लग्नगाठ बांधली.
रशियाने जेव्हा २०१४मध्ये क्रिमियावर आक्रमण केले तेव्हा तिने लष्करी प्रशिक्षण घेतले. तेव्हा ती स्नायपर बनली.
एव्हगेनिया एमराल्ड म्हणते, मी माझ्या कमांडरकडे आले तेव्हा मी त्याला विचारले, 'मी सर्वोत्तम काय करू शकते?' तेव्हा त्यांनी 'तू स्निपर होशील. मी खऱ्या अर्थाने स्नायपर झाली असून एकदा बंदुकीतून सुटलेही गोळी ही शत्रूला संपवल्या शिवाय राहत नाही.








