(5 / 4)उद्धव ठाकरे म्हणाले एका पक्षाचे एका व्यक्तीचे सरकार देशाला हुकूमशाहीकडे नेते. आम्हाला सरकार हवे पण ते भारत सरकार हवे. तुमच्या नावाची पाठी तुमच्या घराला लावा नाहीतर तुम्ही झोला उचलून कुठे जाणार तेथील गुहेला लावा, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. बाळासाहेब ठाकरेंनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती, ती शिवसेना तुम्ही संपवायला निघाला आहात. मात्र, आज तुमच्यासोबत कोण आहे? अमित शहांच्या गाडीत मूळचे भाजपवाले किती? आणि स्टेपण्या किती आत आहेत ते बघा.