मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये आज सभा आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी औरंगाबाद इथं सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार याची उत्सूकता महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे.
(हिंदु्स्तान टाइम्स)सभेच्या आधी स्टेजच्या जवळ उभारला गेलेला हा संभाजी महाराजांचा पुतळा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. औरंगाबादचं संभाजी नगर अशा नामांतराची आज घोषणा होणार का? हा आज सर्वात जास्त चर्चेला आलेला मुद्दा आहे.
(महाराष्ट्र टाइम्स)औरंगाबादच्या सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सभेच्या ठिकाणी वातावरण भगवं करण्यात आलं आहे. राज्यभरातून शिवसैनिक इथं येणार असल्यानं सभेत कोणतीही कसर राहाणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
(टाइम्स ऑफ इंडिया)राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथं येणार आहेत. आज औरंगाबाद भगव्या रंगात न्हाऊन निघणार आहे. मात्र पोलिसांनी घालून दिलेल्या १७ अटीशर्तींचं पालन या वेळेस करावं लागणार आहे
(हिंदुस्तान टाइम्स)