शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘जनसंवाद यात्रा’ आज कोकणात होती. कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोकणातील खेड ते मुंबई वंदे भारत ट्रेनने प्रवास केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा सुरू आहे. आज ही यात्रा कोकणात होती. या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक वंदे भारत ट्रेनने प्रवास केला.
कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे खेडमधून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी आपल्या वाहनातून न जाता वंदे भारतने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही होत्या.
खेड रेल्वे स्टेशनवरून उद्धव ठाकरे यांनी गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनमधून मुंबईकडे प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर आणि खासदार विनायक राऊतही होते.