(4 / 6)राज लिंबानी- भारतीय अंडर-१९ संघाचा वेगवान गोलंदाज राज लिंबानी त्याच्या लाईन लेन्थ आणि स्विंगने भुवनेश्वर कुमारची आठवण करून देतो. तो भुवीप्रमाणेच चेंडू आत आणि बाहेर स्विंग करू शकतो. लिंबानीसाठी हा विश्वचषक खूप खास होता. त्याने ६ सामन्यात ११ विकेट घेतल्या. राजचे भविष्यही खूप उज्ज्वल आहे.