twin tower noida demolition live today : उत्तर प्रदेशातील नोएडात बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या ट्विन टॉवर्सला आज दुपारी २.३३ वाजता पाडण्यात आलं आहे.
(1 / 5)
नॅशनल बिल्डिंग कोडच्या नियमांची पायामल्ली करून ट्विन टॉवर्स बांधण्यात आले होते, परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नोएडातील ट्विन टॉवर्सला आज दुपारी २.३३ वाजता पाडण्यात आलं आहे.(Raj K Raj/ Hindustan Times)
(2 / 5)
ट्विन टॉवर्सच्या बांधकामामुळं त्या लगत असलेल्या घरांमध्ये सूर्यकिरणं पोहोचत नव्हती. त्यानंतर डिटोनेटरचं बटण दाबल्यानंतर ट्विन टॉवर काही सेकंदात खाली कोसळलं, त्यामुळं आकाशात धुळीचा गोळा तयार झाला होता.(Raj K Raj/Hindustan Times)
(3 / 5)
नोएडाच्या सेक्टर ९३A मधील ट्विन टॉवर्स (अॅपेक्स आणि सियान) ही देशातील सर्वात उंच इमारत होती, त्याला आता स्फोटकांच्या सहाय्यानं पाडण्यात आलं आहे.(Raj K Raj/Hindustan Times)
(4 / 5)
ट्विन टॉवर पाडल्यानतंर जवळपास ५० हजार टन वजनाच्या मलब्याचा ढीग काढण्यासाठी पुढील तीन ते चार महिने लागणार आहेत. याशिवाय आता प्रशासनाकडून परिसरातील धुळीचा थर हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम केलं जाणार आहे.(Raj K Raj/Hindustan Times)
(5 / 5)
गेल्या दहा वर्षांपासून या इमारतीबाबत कायदेशीर वाद न्यायालयात सुरू होता. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ट्वीन टॉवर्सला स्फोटकांच्या सहाय्यानं पाडण्यात आलं आहे.(Raj K Raj/Hindustan Times)