महाकुंभावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनोरंजन उद्योगाशी निगडित लोकही तिथे जाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. टीव्ही अभिनेत्री स्मिता सिंह मकर संक्रांतीच्या आधी तिथे पोहोचली होती आणि ती कल्पवासात आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक रील पोस्ट केल्या आहेत. पहा ती प्रयागराजमध्ये कसे जीवन जगत आहे.
स्मिता सिंहने मनोरंजन क्षेत्रात बराच काळ घालवला आहे. तिने 'कोई अपना सा', 'कुसुम', 'वो रहेने वाली महलों की', 'खिचडी' आणि 'हिटलर दीदी' या लोकप्रिय शोमध्ये काम केले आहे. तिची धर्मावर गाढ श्रद्धा आहे. ती देशातील अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवाची पूजा करत असते.
यावेळी स्मिता महाकुंभ २०२५मध्ये कल्पवास करत आहे. कल्पवासाच्या जीवनातील अनेक झलक तिने आपल्या क्लिपमधून प्रेक्षकांना दाखवल्या आहेत. तिने यामध्ये सांगितले की, तिकडे सर्व कामे स्वतःच करावी लागतात. ती जिथे सध्या राहत आहे, तिथे वाळू देखील खूप येते, त्यामुळे सतत स्वच्छताही करावी लागते.
स्मिता म्हणाली की, तिला सर्दी होऊ नये म्हणून तिचे अंथरूण पेंढ्यावर ठेवून झोपावे लागते. पूर्वीच्या काळी सर्दी टाळण्यासाठी हा उपाय जात होता.
स्मिताने या जीवनाविषयी बोलताना सांगितले की, त्यांना स्वतःचे जेवण बनवावे लागते. तेथे लसूण आणि कांदा खाण्यास मनाई आहे. त्यामुळे ती जवळच्या दुकानात जाऊन वाटाणा, कोबी, बटाटे अशा भाज्या आणते आणि तिथेच खोलीत अन्न शिजवते.
एका क्लिपमध्ये स्मिता नाल्याजवळील वाळू आणि माती फावड्याने काढताना दिसत आहे, जेणेकरून तेथे पाणी साचून रोगराई पासरणार नाही.