Navratri Special: सर्व टीव्ही अभिनेत्रींनी पडद्यावर माँ दुर्गाची भूमिका साकारली आहे. आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत.
(1 / 7)
नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांनी छोट्या पडद्यावर माँ दुर्गाची भूमिका साकारली आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्रीं विषयी...
(2 / 7)
टीव्ही अभिनेत्री सोनारिका भदौरियाने 'देवों के देव महादेव'मध्ये पार्वतीची भूमिका साकारली होती. या शोमध्ये तिने दुर्गा मातेचे काली रूप धारण केले होते.
(3 / 7)
टीव्ही अभिनेत्री पूजा शर्मा महाकाली या मालिकेत नवदुर्गेच्या वेगवेगळ्या रूपात दिसली होती. या भूमिकेसाठी तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.
(4 / 7)
टीव्ही अभिनेत्री रती पांडेने 'देवी आदि पराशक्ती'मध्ये दुर्गेची भूमिका साकारली होती. रती पांडे ही मिली जब हम तुम या शोमध्ये नुपूरची भूमिका साकारण्यासाठी देखील ओळखली जाते.
(5 / 7)
'विघ्नहर्ता गणेश' या टीव्ही शोमध्ये अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने माता पार्वतीची भूमिका साकारली होती. अंकाक्षा पुरी बिग बॉस 13 मुळे प्रकाशझोतात आली होती. त्यावेळी अभिनेत्री पारस छाब्राला डेट करत होती. ती सलमान खानच्या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती.
(6 / 7)
टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय कलर्स शो नागिनमध्ये नागिनची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. मात्र, अभिनेत्रीने 'देवों के देव महादेव'मध्येही माता सतीची भूमिका साकारली होती.
(7 / 7)
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरने माँ शक्ती या मालिकेत दुर्गा देवीची भूमिका साकारली होती. दलजीत बिग बॉस 13 चा देखील सहभागी झाली होती.