‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटातील अभिनेता कार्तिक आर्यनचा अभिनय पाहण्यासारखा आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आता या चित्रपटातील आणखी एका कलाकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात मराठी मालिका विश्वात काम करणारा अभिनेता देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. हा अभिनेता कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात एक मराठमोळं नाव आहे ते म्हणजे अभिनेता नितीन भजन याचे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ आणि ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकांमधील सुपरकॉप एसीपी भुषण शेरेकर हे पात्र सर्वांच्याच परिचयाचे आहे.
रुबाब झाडणारा, फुशारक्या मारणारा, भोसलेवर डाफरणारा शेरेकर ‘मोर’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ही पात्रं साकारणारा अभिनेता नितीन भजन हा सध्या बहुचर्चित चंदू चॅम्पियन’मध्ये दिसत आहे.