Tula Shikvin Changlach Dhada: ३ दिवसांचं शूटिंग आणि भरपूर मेहनत; कुस्तीच्या सीनसाठी खऱ्याखुऱ्या आखाड्यात उतरला ‘अधिपती’!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tula Shikvin Changlach Dhada: ३ दिवसांचं शूटिंग आणि भरपूर मेहनत; कुस्तीच्या सीनसाठी खऱ्याखुऱ्या आखाड्यात उतरला ‘अधिपती’!

Tula Shikvin Changlach Dhada: ३ दिवसांचं शूटिंग आणि भरपूर मेहनत; कुस्तीच्या सीनसाठी खऱ्याखुऱ्या आखाड्यात उतरला ‘अधिपती’!

Tula Shikvin Changlach Dhada: ३ दिवसांचं शूटिंग आणि भरपूर मेहनत; कुस्तीच्या सीनसाठी खऱ्याखुऱ्या आखाड्यात उतरला ‘अधिपती’!

Published Jul 05, 2024 02:59 PM IST
  • twitter
  • twitter
Tula Shikvin Changlach Dhada: मानसिकरित्या काटक झालो आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे, याची या सीनने पुन्हा आठवण करून दिल्याचं हृषिकेश म्हणाला.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये हल्लीच कुस्तीचा एक सीन दाखवला गेला. भुवनेश्वरीने अधिपती आणि अक्षराला १० दिवसांचे आव्हान दिले होते. घराबाहेर राहून दोघांना सिद्ध करून दाखवायचे होते की, ते आपल्या संसाराची जबाबदारी घेण्यास सक्षम आहेत.
twitterfacebook
share
(1 / 6)

अधिपती-अक्षराच्या या कसोटीत खूप आव्हानंही येतात. या कुस्तीमध्ये जिंकलेले पैसे दुर्गेश्वरी-चंचला चोरतात, भुवनेश्वरी अक्षरा अधिपती ज्या काकांच्या घरात राहतात, त्या काकांना दोघांकडून घराचं १० हजार भाडं वसूल करायला लावते. पण, सगळी आव्हानं पूर्ण करुन ते दोघे घरी येतात. घरात सगळे त्यांचं कौतुक, स्वागत करतात.
twitterfacebook
share
(2 / 6)

कुस्तीच्या सीनसाठी केलेली मेहनत आणि त्याचा अनुभव याबद्दल बोलताना हृषिकेश शेलारने सांगितले की, ‘कुस्तीचा अनुभव खूप छान होता. सलग ३ दिवस शूट करत होतो. थकलो होतो, तरी ही जेव्हा तो सीन शूट करून झाल्या तेव्हा छान वाटलं.
twitterfacebook
share
(3 / 6)

‘मानसिकरित्या काटक झालो आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे, याची या सीनने पुन्हा आठवण करून दिली. मला आनंद आहेत की, मी यशस्वीपणाने कुस्ती सीन करू शकलो. मला फारसं कुस्तीचं ज्ञान नाही. पण, एकदा लहानपणी गावाकडे असताना मी कुस्ती खेळलो होतो आणि त्यात मला २१ रुपयांचे बक्षीस मिळाले होते’, हा किस्सा देखील हृषिकेशने सांगितला.
twitterfacebook
share
(4 / 6)

हृषिकेश म्हणाला की, ‘कुस्तीचे डाव किंवा तालिमीत मी शिकलो नाही. मी व्यायाम नियमितपणे अनेक वर्ष करत आहे. मग ते घरी असो, किंवा व्यायामशाळेत... व्यायामाची मला आवड आहे आणि त्याचा मला इथे फायदा झाला आहे. सीनसाठी सेटवरती जे तालिमीतले लोक आले होते, मी त्यांच्याकडून काही डाव शिकलो आणि त्याचा उपयोग मी सीनमध्ये तिथल्यातिथेच केला.’
twitterfacebook
share
(5 / 6)

‘काही वर्षांपूर्वी माझा एकदा एक अपघात झाला होता. यात पायाचा लिगामेंट टियर झाला होता. तर, त्याची काळजी घ्यावी लागत होती. हा सीन करण्यासाठी फक्त माझी एकट्याची मेहनत नाही पूर्ण टीममुळे हा सीन अजून उत्तमपणे झाला’, असे हृषिकेश म्हणाला.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज